
Hari Mazha,Mi Harit
About this piece
This evocative artwork merges the divine
presence of Lord Vitthal with the soulful gaze of an elderly devotee, a
Warkari, symbolizing the deep-rooted spiritual connection between Bhagwan
and Bhakta. The black stone idol adorned with chandan tilak and a silver
crown flows seamlessly into the face of a weathered yet radiant seeker,reflecting that divinity is not just
worshipped in temples but lives within those who surrender with pure devotion. The red turban, the expressive eye, and
the sacred forehead markings speak of a life steeped in faith, pilgrimage, and
unwavering surrender. This visual fusion is a poetic reminder that “Hari is in
me, and I in Hari” - the ultimate union of the mortal with the eternal. Surrounding this fusion are parijatak (coral jasmine) blossoms, with a tender sprig of Tulsi, the holy basil revered by Lord Vitthala, standing vibrant in green at the bottom - a subtle yet profound reminder of purity, devotion, and eternal connection between the divine and the human.
A tribute to the Warkari tradition,
this piece invites viewers to reflect on the intimate relationship between man
and God - where devotion
transcends boundaries, and the devotee becomes one with the divine.
शिर्षक: हरि माझा, मी हरित माध्यम: Acrylic on Canvas Size: 15”x 18” कलावंत: नरेंद्र गंगाखेडकर
कलाकृतीचे वर्णन:
ही भावस्पर्शी कलाकृती भगवंत आणि भक्त यांच्यातील अद्वैत नाते उलगडून दाखवते. एका बाजूला पांडुरंगाच्या काळ्या शिळेतील विग्रहाचे दर्शन होते—गंध, रजत मुकुट आणि अभंग श्रद्धेचा सुगंध दरवळणारे. तर दुसऱ्या बाजूला, वयस्क वारकरी भक्ताचे डोळे, कपाळावरचे तीळक आणि त्याचे अनुभवांनी भरलेले रेखीव चेहरे, भगवंताच्या अखंड भजनात रमलेली एक जीवनयात्रा दर्शवतात.
ही दोन अर्धाकृती एकत्र येऊन एक संदेश देतात — “हरि माझ, मी हरित” - म्हणजेच भगवंत भक्ताच्या हृदयातच वास करतो, आणि भक्तदेखील भगवंतात विलीन होतो. या संगतीभोवती फुललेली पारिजातक फुले आणि खालच्या बाजूस दिसणारी तुळशीची कोवळी पालवी -विठोबाची आवडती—ही भक्तीतील शुद्धतेचे प्रतीक आहे.
ही कलाकृती वारकरी परंपरेला समर्पित आहे. ती प्रेक्षकांना आत्मपरीक्षणाची, भक्तीची आणि अध्यात्मिक एकात्मतेची जाणीव करून देते. जिथे देव आणि भक्त वेगळे राहत नाहीत - ते एकरूप होतात.
नरेंद्र ग़ंगाखेडकर